- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास तुळजापूर-नागपूर महामार्गावरील वर्ध्याच्या सालोड-नागठाणा(सावंगी बायपास)परिसरात घडली.
मोनाली निलेश मेश्राम वय ३७ वर्षे व किशोरी उके वय ४९ वर्षे दोघीही रा.गजानन नगर,नागपूर अशी मृतक महिलांची नावे आहेत.तर तुषार लक्ष्मणराव जाधव(वाहन चालक)वय ३७ वर्षे,तनिष चंद्रशेखर उके वय ६ वर्षे, दिव्यांशी निलेश मेश्राम वय १० वर्षे,आराध्य संतोष उके वय १३ वर्षे, ईशान्य अनिल बारसकर वय १७ वर्षे,नीता अनिल बारसकर वय ५५ वर्षे,साधना अनिल बारसकर वय ५६ वर्षे,कांचन चंद्रशेखर उके वय ४२ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.
नागपूरच्या गजानन नगर परिसरातील दहाजण एमएच ४९ यू ०१७९ क्रमांकाच्या इर्टिगा कारने सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर व अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते.दर्शन आटोपून सर्वजण महामार्गाने नागपूरकडे परत येत होते.दरम्यान, वर्ध्याच्या सावंगी बायपास मार्गावर भाविकांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात जाऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले.अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.अपघातात कारमधील आठ जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.रात्रभर ड्रायव्हिंग केल्याने चालकाला झोपेची डुलकी आली असावी आणि सदरचा अपघात घडला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

