Thursday, September 24, 2026
Homeनागपूरउद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.त्यानुसार उद्या,मंगळवार १६ जूनपासून राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याने संपामुळे राज्यातील वाहन परवाने,गाड्यांचे पासिंग,आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरटीओ म्हणजेच मोटार वाहन विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे उलटून गेली आहेत.तरीही अद्याप सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आलेले नाहीत.नियम तयार नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळत नाही.यामुळे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे.असा आरोप संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.संपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी नुकतीच संघटनेची एक तातडीची आणि महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या या केवळ प्रशासन स्तरावर सहज सुटू शकतात,मात्र वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.बैठकीअंती आता बेमुदत संपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे सदरचा संप पुकारण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!