Friday, May 1, 2026
Homeनागपूरउद्यापासून आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन.. - विरोधक विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात..

उद्यापासून आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन.. – विरोधक विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या,सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून नागपुरात सुरू होत आहे.राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.यामुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे.या वातावरणातच जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार हे अधिवेशन जेमतेम आठवडाभर असेल.यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्यांवर घेरण्याच्या प्रयत्नात आहेत.राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरच्या मतदानाला जेमतेम ४८ तास उरले असतांना निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केला.या मुद्यावर विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार यादी,मतदारसंघांचे वाटप या मुद्यांवरुन सभागृहात वातावरण तापण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ,मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदीचा व्यवहार,कथित सिडको जमीन घोटाळा,डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतील.तर सरकार या प्रकरणांमध्ये स्वतःची बाजू मांडेल तसेच महत्त्वाच्या विषयांवर विधिमंडळात सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करेल. विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे.या मुद्यावरुन कदाचित अधिवेशनाचा सर्वाधिक काळ खर्ची जाण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!