उद्रेक न्युज वृत्त
मुंबई:- सध्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सुरू असून राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत.संपावर गेल्याने दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२००५ पूर्वी व २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,आश्वासित प्रगती योजना लागू करावी,शिक्षकांची रिक्त असलेले पदे भरण्यात यावी; इत्यादी मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे.याच मागण्या जाऊनही पूर्ण करण्यात आलेल्या नसल्यामुळे शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
परीक्षेच्या आधीपासूनच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला नाही.म्हणूनच शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम बंद केले आहे आणि यावर बहिष्कार टाकला आहे.याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर सुद्धा होऊ शकतो.अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.