Thursday, April 30, 2026
Homeमध्य प्रदेशचार्जिंगला मोबाईल फोन लावून बोलणे पडले महागात- मोबाईल फोनचा स्फोट; डोक्यापासून छातीपर्यंत...

चार्जिंगला मोबाईल फोन लावून बोलणे पडले महागात- मोबाईल फोनचा स्फोट; डोक्यापासून छातीपर्यंत उडाल्या चिंधड्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मध्य प्रदेश (उज्जैन) :- चार्जिंगला लावून बोलत असतांना मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला.स्फोट इतका भयावह होता की,डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या.हातही धडापासून वेगळा झाला.मध्य प्रदेशातील उज्जैनपासून ४० कि.मी.वरील बडनगर या गावात ही भयावह घटना घडली.दयाराम बारोड वय ६८ वर्षे असे मृताचे नाव आहे.ओप्पो कंपनीच्या या मोबाईल फोनचे तुकडे जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत.बारोड शेतातील घरात एकटेच राहत होते.मित्र दिनेश चावडा यांच्यासोबत ते इंदूरसाठी निघणार होते; पण बारोड अजून आले नाहीत म्हणून फोन केला तर तो बंद होता. नंतर चावडा हे स्वतः बारोड यांच्या शेतातील घराकडे गेले. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला.

चार्जिंगदरम्यान स्फोट होण्याची कारणे

चार्जिंग दरम्यान फोनमध्ये रासायनिक बदल होतात. यावेळी फोनवर बोलण्याने, गेम खेळल्याने बॅटरी गरम होते व स्फोट होतो.

चार्जिंगदरम्यान फोनच्या आजूबाजूला किरणोत्सर्गाचे प्रमाणही वाढलेले असते. अशावेळी बॅटरी स्फोटाची शक्यता बळावते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!