Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउंदीर पकडले १५६; अन् खर्च केला ६९ लाख...

उंदीर पकडले १५६; अन् खर्च केला ६९ लाख…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

लखनौ :- आपण कधी ऐकले वा कधी बघितले सुध्दा नसेल की,खरे आहे की खोटे; मात्र सदरची घटना ही माहिती अधिकारात उघड झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी मागितलेल्या माहिती नुसार उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने गेल्या तीन वर्षांत केवळ १५६ उंदीर पकडण्यावर तब्बल ६९ लाख ४० हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

गणित मांडायचे झाले तर रेल्वेच्या लखनौ विभागाने सहा दिवसांत एक उंदीर पकडला आणि त्यावर ४१ हजार रुपये खर्च केले.हा मुद्दा पकडून काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी देशात जागोजागी असे भ्रष्टाचाराचे उंदीर सापडले; अशी शेरेबाजी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,एकट्या लखनौ विभागात ही स्थिती असेल तर अन्यत्र कशी परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.

यासंदर्भात रेल्वेनेही आपली बाजू मांडली आहे.ही रक्कम केवळ उंदीर पकडण्यावर खर्च झालेली नाही. रेल्वेत होणारा डास,ढेकूण,झुरळ,पाली आदींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने विविध द्रव्यांची फवारणी केली जाते.उंदीर पकडण्याबरोबरच अन्य प्रतिबंधक उपायांचा समावेश असल्याचा खुलासा रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!