Tuesday, July 28, 2026
Homeमुंबईआरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्या प्रकरणी तब्बल ११ पोलीस निलंबित...

आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्या प्रकरणी तब्बल ११ पोलीस निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एखाद्या खाजगी वा सार्वजनिक ठिकाणी गदारोळ होऊन कुणावर शाई फेकली जाते तर कुणाला काळे फासले जाते.असा काहीसा प्रकार अनेक ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वत्र बघितला आहे.मात्र,कडेकोट बंदोबस्त, सुरक्षा व फौजफाटा असतांनाही न्याय मंदिरात एखादी अनुचित घटना घडत असेल तर यांस जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जातो.न्यायाधीशांवर चप्पल भिरकावणे आणि बंदुकीसह संचार या दोन्ही प्रकरणांत सखोल चौकशीनंतर तब्बल ११ पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.२१ डिसेंबरला दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असतांनाच कल्याण जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांच्या दिशेने खून प्रकरणातील आरोपीने चप्पल भिरकावली होती.शिवाय त्याच दिवशी एक बंदूकधारी खासगी सुरक्षा रक्षक न्यायालय आवारात फिरत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेऊन पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी,कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयीन कर्तव्यावरील ११ पोलिसांना काल,गुरुवारी २६ डिसेंबरला सेवेतून निलंबित केले.यात एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.विशेष म्हणजे चप्पल भिरकावणे आणि बंदूकधारी या दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चप्पल फेकल्याच्या घटनेनंतर आरोपीच्या सोबत असलेले पोलिस काय करत होते? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान,याच न्यायालयातील दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन कामासाठी आवारात आलेल्या व्यक्तीसोबत एक बंदूकधारी खासगी सुरक्षा रक्षक फिरत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. न्यायालयाच्या आवारात शस्त्र घेऊन फिरण्यास प्रतिबंध असतांना बंदूकधारी इसम न्यायालय आवारात आलाच कसा? असा सवाल वकिलांकडून उपस्थित करण्यात आला.याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौकशी करण्यात आली.न्यायालयाच्या आवारात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्तव्यात हयगय करीत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानंतर ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!