Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.. - उद्यापासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही.....

आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.. – उद्यापासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही.. – आंदोलक मनोज जरांगे पाटील

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षण मिळावे,यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे.आज,रविवार आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू आहे.आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले असून लाखो मराठा समाज बांधवांचा जत्था मुंबईत ठाण मांडून बसला आहे.काल शनिवारी बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील नागरिकांनी टेम्पो भरून भाकरीसोबत ठेचा व इतर साहित्य मुंबईतील आंदोलनकर्त्यांना पाठवून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली.अश्यातच आज रविवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कडक उपोषणाचा इशारा दिला आहे.आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण तसेच मुंबई सोडणार नाही व उद्यापासून शरीरात पाण्याचा एक थेंबही घेणार नाही,असा पवित्रा घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.त्यातच आंदोलनकर्त्यांनी घाई गडबड,दगडफेक,गोंधळ करु नये,आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय इथून हटणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे,ते मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील काळात महाराष्ट्रातील मराठा लोक बाहेर पडतील. त्यानंतर मुंबई तर सोडा येथून दोनशे किलोमीटर माणसे पाहायला मिळतील.मी जे बोलतो ते करतोच हे सर्वांना माहिती आहे.असेही ते म्हणाले.त्यामुळे आता मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची डोकेदुखी वाढण्याची नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा आज,मंगळवार २६ मे...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी.. – वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे...

​अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.. -दोन वेगवेगळ्या छाप्यात ५ आरोपींवर गुन्हे दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेश मेश्राम व पोलीस कॉन्स्टेबल नितीन...

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!