Sunday, September 6, 2026
Homeमुंबईआमदार अबू आझमींना औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य भोवले... -अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित..

आमदार अबू आझमींना औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य भोवले… -अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार ३ मार्च पासून सुरू झाले आहे.सदरचे अधिवेशन हे ३ मार्च ते २६ मार्च २०२५ पर्यंत असणार आहे.१० मार्च रोजी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.अशातच यंदाचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांनाच आज,५ मार्चला समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला.त्यानंतर सदर प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल मंगळवारी करण्यात आली होती. यानंतर आज बुधवारीही त्याच मुद्द्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाला आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला गेला.मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती.उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते,असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत एकमताने अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!