Sunday, May 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआमच्या मुळावर जो येईल; त्याला आम्ही धडा शिकवू...-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

आमच्या मुळावर जो येईल; त्याला आम्ही धडा शिकवू…-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गणपती उत्सवाला गालबोट न लागता तो उत्साहात साजरा व्हावा; तोडफोडीचे राजकारण संपवून मन दुखावणारं राजकारण बंद होऊ दे..! अशी प्रार्थना विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.तसेच गरिबाला गव्हाच्या ऐवजी मका दिला जात आहे.गरीब मका खातो का? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी  केला.

आजचा पवित्र दिवस असून गणपतीची स्थापना आमच्या घरी करण्यात आली.गणपती बुध्दीची देवता आहे.यानिमित्ताने सगळ्यांना सुखी आनंदी राहू दे.महाराष्ट्रावर, देशावर कोणाची वाईट नजर पडू देऊ नको;अशी प्रार्थना केली.सरकारला शेतकऱ्यांना भरभरून मदत करण्याची सद्बुद्धी बाप्पांनी द्यावी; अशी अपेक्षा विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

पुढे आरक्षण प्रश्नावर बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की,कुणबी कृती समितीने आंदोलन स्थगित केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन आता पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ७ दिवसात सरकार बैठक लावतील अशी अपेक्षा आहे. फूट वगैरे पडायचा विषय नाही.ओबीसी हितासाठी जो लढतो तो आंदोलनात टिकेल ज्याला पक्षाची झुल पांघरायची आहे ते नालायक आहेत.आंदोलन संपले म्हणजे लढाई संपली असा त्याचा अर्थ नाही.आमच्या मुळावर जो येईल त्याला आम्ही योग्य वेळी धडा शिकवू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!