Monday, January 19, 2026
Homeमुंबईआनंदाची बातमी... शेतकरी बांधवांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे मिळून ४...

आनंदाची बातमी… शेतकरी बांधवांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे मिळून ४ हजार रुपये ‘या’ तारखेला होणार वितरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :- पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट  ते नोव्हेंबर या कालावधीतील अनुक्रमे १८ वा व ५ हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवार दिनांक- ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
या समारंभामध्ये पीएम किसान योजने अंतर्गत २००० रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत २००० रुपये असा एकूण ४००० रुपये चा लाभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते राज्यातील सुमारे ९१.५२ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल.पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी  सहभागी व्हावे; असे आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.. – डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा; तर हाताचे बोट छाटलेले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील...

पुढील वित्तीय वर्षासाठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे,तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार,दुर्गमता,दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर...

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात...

तक्रारदार केवळ मागासवर्गीय आहे म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही.. -अपमान करण्यामागे त्या व्यक्तीला जातीवरून नीचा दाखवण्याचा हेतू असणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा धाक दाखवून अनेकांना कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न करीत असतात.पण,कायदा हा सर्वांसाठी समान आहे.नाहक ठोस पुराव्याअभावी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!