Sunday, June 21, 2026
Homeगडचिरोलीआता होमगार्ड बंधूंचे रोजगारासाठी इतरत्र भटकणे होणार बंद.. - वर्षातून इतके दिवस...

आता होमगार्ड बंधूंचे रोजगारासाठी इतरत्र भटकणे होणार बंद.. – वर्षातून इतके दिवस मिळणार काम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-बंदोबस्तात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य पार पाडण्यात होमगार्ड हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावित असतात. त्यामुळे पोलिस खात्यात होमगार्डला विशेष महत्व आहे.मात्र, होमगार्डला काम मिळेनासे झाल्याने त्यांना प्रपंच चालविण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत आहे. यावर उपाययोजना करीत राज्य शासनाने होमगार्डसाठी ६ महिने रोजगार देण्याची घोषणा केली असून,त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे.

जिल्ह्यात पोलिस दलासोबत कार्यरत असलेल्या होमगार्डना अत्यल्प मानधन दिल्या जाते.यातही नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.सदर कामावर भागत नसल्याने कधी रिक्षा तर कधी बांधकामावरही होमगार्ड राबत आले आहेत. गृहरक्षक दलातील जवानांची ही दयनीय अवस्था लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड जवानांना वर्षातून किमान १८० दिवस काम देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार वर्षातून किमान ६ महिने गृहरक्षकांना काम मिळणार आहे.यामुळे गृहरक्षक दलातील जवानांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागणार नाही; अशी अपेक्षा आहे.
अल्प मानधनामुळे बचत नाहीच होमगार्डला प्रतिदिवस ६८० रुपये मजूरी दिली जाते.वाढत्या महागाईच्या तुलनेत रक्कम अतिशय कमी आहे. त्यामुळे मजूरी वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा ईपीएफ जमा होत नसल्याने आधीच अल्प मानधन असलेल्या होमगार्डना बचत करता येत नाही.शासनामार्फत नियुक्ती होऊन ईपीएफ जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यांची भविष्यासाठी एक पैसाही बचत राहत नाही.त्यामुळे शासनाने ईपीएफ जमा करावा; अशीही मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!