Friday, July 31, 2026
Homeनागपूरआता स्फोटक कंपनीतील मृतांची संख्या २२; गंभीर जखमी असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा...

आता स्फोटक कंपनीतील मृतांची संख्या २२; गंभीर जखमी असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती कंपनीत रविवार,१ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी असलेल्या आणखी दोन महिला कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आम्रपाली अनिल काळसर्पे वय ३८ वर्षे व रोशनी सूर्यकांत उमाठे वय २८ वर्षे यांनी नागपूर येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता २२ वर पोहोचला आहे.१ मार्च रोजी सकाळी सात ते साडे आठ वाजता कारखान्यातील १६-बी आणि २०-बी नॉनल क्रिम्पिंग युनिटमध्ये जोरदार स्फोट झाला होता.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.या दुर्घटनेत आतापर्यंत २० महिला आणि २ पुरुष कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर २० हून अधिक कामगार भाजून जखमी झाले आहेत.त्यांच्यावर नागपूरमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर स्फोटक उद्योगातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.स्थानिक आमदार चरणसिंह ठाकूर यांनी विधानसभेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!