- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या असून आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे वेध लागून अधिवेशनाची तयारी जोरो-शोरोसे सुरू असल्याचे कळते.राज्यातील नवीन सरकार अजून स्थापन झाले नसले तरी नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे.यंदा दोन्ही सभागृहात आमदारांच्या बैठकीसाठी नवीन व्यवस्था करण्यात येत असून,सर्वांच्या टेबलवर लॅपटॉपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.विधान परिषदेतील सभागृहात हे काम पूर्ण झाले असून,येत्या काही दिवसात विधानसभेतील आमदारांच्या बैठकीच्या ठिकाणीही लॅपटॉप लावले जातील.
राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी लवकरच होईल.शपथविधीनंतर दोन,तीन दिवसांचे अधिवेशन मुंबईत होईल.त्यानंतर नागपुरात अधिवेशन होईल.हे अधिवेशन आठवडाभराचे राहील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दुसरीकडे प्रशासन अधिवेशनाबाबत तयारीत आहे.आधीपासून विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे विलास आठवले यांनी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भातील आढावा घेतला.यावेळी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.डिसेंबर महिन्यात अधिवेशन होणार असल्याने ९ डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
त्यामुळे प्रशासनानेही कामाला गती दिली आहे. मुंबईप्रमाणेच नागपुरातही दोन्ही सभागृहात सदस्यांच्या बैठकीच्या ठिकाणी लॅपटॉप लागणार आहे.पहिल्या टप्प्यात विधानपरिषदेत ही व्यवस्था लागली आहे.येत्या काही दिवसात विधानसभेतही सर्व सदस्यांच्या टेबलवर लॅपटॉप लागतील.विशेष म्हणजे याच कामासाठी विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.यावरून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमधील मतभेदही समोर आले होते.
- Advertisement -