Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता विद्यार्थ्यांना सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी म्हणावे लागेल हजर गुरुजी..!

आता विद्यार्थ्यांना सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी म्हणावे लागेल हजर गुरुजी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या शाळा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हजेरदारीसंदर्भात नवीन आदेश जाहीर केले आहेत.त्यानुसार,विद्यार्थ्यांनी दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी असे उपस्थितीत राहावे लागणार आहे. जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित राहिला,तर त्याच्या पालकांना तात्काळ एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल.शाळांमध्ये वर्गाच्या दरवाजे,कॉरिडोर,मुख्य प्रवेशद्वारे,खेळाच्या मैदानासमोर आणि शौचालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले असून,एका महिन्याचा व्हिडीओ बॅकअप ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्यापूर्वी पोलिसांकडून पात्रता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे; जर त्यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास असेल तर त्यांची सेवा ताबडतोब समाप्त करण्यात यावी,असे सांगितले आहे.मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे शौचालय असावेत,प्रत्येक शौचालयाजवळ परिचारक नियुक्त केले जावेत तसेच पाणी,प्रकाश आणि आपत्कालीन घंटी उपलब्ध असावीत,असेही निर्देश आहेत.व्हिडीओ बॅकअप ठेवण्याचे आदेश शाळांमध्ये वर्गाच्या दरवाजे,कॉरिडोर, मुख्य प्रवेशद्वारे,मैदान आणि शौचालयांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केले गेले आहे.एक महिन्याचा व्हिडीओ बॅकअप ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!