Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'या' महिलांना वर्षाला मिळणार ३ गॅस सिलेंडर मोफत…-शासन जीआर निघाला; जाणून...

आता ‘या’ महिलांना वर्षाला मिळणार ३ गॅस सिलेंडर मोफत…-शासन जीआर निघाला; जाणून घ्या माहिती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जारी केली आहे.या योजनेंचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.तसेच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

काय आहेत अटी ?👇

गॅस जोडणी असणाऱ्या महिला लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार

योजनेसाठी एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी पात्र असेल

एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर एका महिन्यात मिळणार नाहीत

१४.२ कि.ग्रॅ.वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच याचा लाभ मिळेल

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला योजनेसाठी पात्र असतील

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र असलेल्या ५२.१६ लाख महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.या योजनेतील लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.त्या संदर्भातील शासन निर्णय आज ३० जुलै रोजी सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ३ कोटीच्या आसपास महिला पात्र ठरण्याचा अंदाज आहे.दरम्यान मागच्या आठवड्यापर्यंत एक कोटी अर्ज आले होते.मात्र अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.बँक खाते नाही,आधार कार्ड बँक खात्यासोबत आणि मोबाईलसोबत लिंक नाही; अशा तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!