Wednesday, November 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता महागाई वाढीची चिन्हे; रुपयाची घसरण अन् डॉलरची वाढ..

आता महागाई वाढीची चिन्हे; रुपयाची घसरण अन् डॉलरची वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-डॉलर हे जगातील सर्वात मोठे चलन आहे.जे बहुतेक व्यवहारांसाठी वापरले जाते.अश्यातच आज भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने महत्त्वाचा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे.आज, बुधवार ३ डिसेंबरला एका अमेरिकी डॉलरची किंमत ९० रुपये २६ पैसे झाली आहे.समजा, तुम्ही विदेशात गेलात आणि तेथील चलन डॉलर असेल तर तुम्हाला काही वस्तू खरेदी करावयाच्या असतील तर तुम्हाला एका डॉलरसाठी ९० रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागेल.व्यापार आणि पोर्टफोलिओमधील मंदीचा ओघ आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील स्पष्टतेबद्दलच्या चिंतेमुळे चलनावर दबाव निर्माण झाला आहे.रुपयाच्या घसरणीचा तात्काळ परिणाम महागाई वाढीत होऊ शकतो.आपण परदेशातून आयात करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील,जसे की पेट्रोल,खते,सोने, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनचे भाग. भारत मोठ्या प्रमाणात परदेशातून खाद्यतेल आणि डाळी आयात करतो. डॉलरच्या वाढीमुळे तेल आणि डाळींच्या किंमती वाढू शकतात, ज्यामुळे त्यांच्या किंमतीवर थेट परिणाम होईल.यामुळे तुमचे स्वयंपाकघर बजेट विस्कळीत होऊ शकते.शिवाय,परदेशी शिक्षण,प्रवास, डाळी,खाद्यतेल,कच्चे तेल,कम्प्युटर,लॅपटॉप,सोने,औषधे, रसायने,खते आणि आयात केलेली अवजड यंत्रसामग्री अधिक महाग होऊ शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना; जिल्हाधिकाऱ्याला सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना(अवमान)केल्याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने रंगारेड्डी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सी.नारायण रेड्डी यांना सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली,तसेच त्यांना दोन...

आजपासून कोंढाळा येथे रंगणार भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा थरार..!

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-दिवाळी सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 'जय जिजाऊ युवा क्रीडा क्लब तथा फोर्स गृप कोंढाळा'च्या वतीने आज,बुधवार ११ नोव्हेंबरपासून ते...

आज भाऊबीज; भाऊबीजेच्या ओवाळणीला तंत्रज्ञानाची जोड..

उद्रेक न्युज वृत्त :-दिवाळी म्हटली की नवीन कपडे, फराळ,रोषणाई,लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेची ओवाळणी डोळ्यांसमोर येते.अश्यातच भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण आज, बुधवार ११...

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!