Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता परीक्षेत कॉपी किंवा गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही.. - सापडल्यास होणार फौजदारी...

आता परीक्षेत कॉपी किंवा गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही.. – सापडल्यास होणार फौजदारी कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेकदा कॉपी बहाद्दर परीक्षेत
 नवनवीन शक्कल लढवून परीक्षा पास होतांना दिसून येतात.राज्याच्या विविध भागात कॉपी बहाद्दर यांच्या समवेत पेपरफुटी व इतर प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.अशातच आता परीक्षेत कॉपी किंवा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.परीक्षांची अखंडता राखण्यासाठी आणि फसवणूक,पेपरफुटी इत्यादी घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.याशिवाय नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये संशोधन आणि विकास कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा काळात किंवा दरम्यान कोणत्याही केंद्रात छोटीशी तक्रार आल्यास संबंधित पथक त्याचे त्वरित ऑडिट करेल.हा सेल देशभरातील केंद्रे,तक्रारी आदींवर लक्ष ठेवणार आहे.अशा केंद्रांवर तात्काळ बंदी घालण्यात येईल.नवीन नियमांनुसार,गैरवर्तन आढळल्यास,थेट भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला जाईल. आतापर्यंत अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून न्यायालय त्यांना ताकीद देऊन सोडत असे, परंतु,२०२५ च्या परीक्षेपासून असे विद्यार्थी पुन्हा कधीही परीक्षेसाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाहीत; असे कडक नियम करण्यात आले आहेत.परीक्षा केंद्राचा प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल.त्याचा रेकॉर्ड एक वर्षापर्यंत राहील.परीक्षेदरम्यान प्रत्येक १५ मिनिटांनी सीसीटीव्ही आणि विद्यार्थ्यांचे फोटो पडताळून पहिले जाईल,असे अनेक नवीन नियम येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!