Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईआता गंभीर आजारांसाठी मिळणार दहा लाख रुपये.. - चंद्रपूर,नागपूर आणि राष्ट्रीय आरोग्य...

आता गंभीर आजारांसाठी मिळणार दहा लाख रुपये.. – चंद्रपूर,नागपूर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानासह २१ महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.बैठकीत विविध मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवित राज्याच्या विकासाच्या दृष्टीने २१ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला आहे.योजनेत आता विविध प्रकारच्या तब्बल २ हजार ४०० आजारांचा समावेश करून उपचारांना मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचाराचे लाभ दिले जात आहे.अश्यातच आता ज्या काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत आहे,त्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच काही ठळक निर्णयांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ३९ शिक्षक व ४२ शिक्षकेतर पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.नागपूर येथील लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआयटी)विद्यापीठ,नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता.सन २०२५-२०२६ ते सन २०२९-२०३० या कालावधीकरीता दरवर्षी ७ कोटी रुपयांचा निधी चार हप्त्यात वितरीत करण्यात येणार आहे.संस्था १९४२ मध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली संस्था आहे.त्याचबरोबर,राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता देण्यात आली आहे.अभियानात १४ मार्च २०२४ रोजी १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्चाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन करण्यात येणार आहे.सेवा प्रवेश नियमांत दुरूस्ती न करता एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार आहे.सार्वनजिक आरोगय विभागातील पदांबरोबर,ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचाही निर्णय घेण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!