Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता आपल्याच मोबाइलवरून करा रेशन कार्डची ई-केवायसी; १५ मार्च पर्यंत मुदत..

आता आपल्याच मोबाइलवरून करा रेशन कार्डची ई-केवायसी; १५ मार्च पर्यंत मुदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील अनेक रेशन कार्ड धारकांना वारंवार सूचना देऊनही अजूनपर्यंत अनेकांनी ई-केवायसी केलेली नाही.अशा कार्डधारकांनी १५ मार्चपर्यंत आपल्याच मोबाइलवरून आपले रेशन कार्ड ई-केवायसी करून घ्यावे अन्यथा राशन मिळणे बंद होऊ शकते,अशा सूचना करण्यात येत आहेत.
अनेक कार्डधारक नोकरी,व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने अशा अनेक कुटुंबांना रेशन कार्ड असलेल्या गावात येता आले नाही.परंतु, आता ज्या शहर,गावात वास्तव्यात आहात त्याच गावातील रास्त भाव दुकानात जाऊन पॉस मशीनला थंब करण्याचीही गरज नाही.
‘मेरा ई-केवायसी ॲप’👇
आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांकरिता ‘मेरा ई-केवायसी ॲप’ सुरू केले आहे.हे ॲप मोबाइल मध्ये डाउनलोड करून उघडल्यावर त्यात कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक टाकावयाचे आहेत.त्यानंतर एक ओटीपी येईल.आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होणार आहे.दिलेल्या सुविधेद्वारे १५ मार्चपूर्वी सर्व कार्डधारकांनी आपले कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे.अन्यथा रेशन उचलण्यास अडथळा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!