उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज) :-कोंढाळा गावापासून आरमोरी मार्गे अवघ्या पाचशे मीटर अंतरावर खडकी धोडी नाला येथे स्कूटी आणि पल्सरची समोरासमोर धडक झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना आज,सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार,रा.निलज(रुई)ता.ब्रम्हपुरी येथील २८ वर्षीय तरुण दुचाकी वाहन(पल्सर)क्रमांक-एम एच ४० बी यु ८२९३ या वाहनाने आरमोरी वरून देसाईगंज मार्गे येत होता.तर ब्रम्हपुरी येथील ४० वर्षीय इसम देसाईगंज वरून आरमोरी मार्गे जात असतांना कोंढाळा गावाजवळील धोडी नाला येथे दोन्ही दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडकेत स्कूटी चालक ४० वर्षीय इसमाचा गुडघ्या पासून डावा पाय मोडला तर २८ वर्षीय तरुणाला चेहऱ्याला,डाव्या हाताला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेबाबत गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली होती.गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश तुपाट यांनी घटनास्थळी धाव घेत; दोन्ही जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.वृत्त लीहिस्तव जखमिंची नावे कळू शकली नाही.