Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीआठ तालुक्यात महिला समुपदेशन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

आठ तालुक्यात महिला समुपदेशन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांना समुपदेशनाच्या माध्यमातून सहाय्य मिळावे,या उद्देशाने महिला व बाल विकास विभागामार्फत दुसऱ्या टप्प्यातील महिला समुपदेशन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.याअंतर्गत कोरची,कुरखेडा, आरमोरी,धानोरा,एटापल्ली,मुलचेरा,भामरागड आणि सिरोंचा या आठ तालुक्यांसाठी इच्छुक संस्थांनी ११ जुलै २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.
या प्रस्तावांसाठीच्या अटी व शर्ती नुसार सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या समुपदेशन केंद्रांना बाजूला ठेवून नव्या संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे.एकाच संस्थेला फक्त एकच प्रस्ताव सादर करता येणार असून त्या प्रस्तावात तालुक्याचे नाव स्पष्टपणे नमूद केलेले असणे आवश्यक आहे.समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत संस्थेचा अधिकृत ठराव सादर करणे बंधनकारक आहे.याशिवाय,संस्थेने नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व आर्थिक व्यवहारासाठी अधिकृत प्रतिनिधीची माहिती प्रस्तावात नमूद करावी.संस्थेचा महिला व बाल कल्याण क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असावा आणि तो अनुभव अहवाल व छायाचित्रांसह प्रस्तावासोबत जोडावा लागेल.तसेच मागील तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल सुद्धा सादर करणे आवश्यक आहे.प्रत्येक संस्थेने आपला प्रस्ताव तीन प्रतीत तयार करून तो जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे ११ जुलै २०२५ पर्यंत सादर करावा.त्या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्जाचे नमुने मिळविण्यासाठी संबंधित संस्थांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!