Friday, September 11, 2026
Homeगोंदियाखून झाल्याचा संशय भावाने व्यक्त केला अन् भांडाफोडच झाला; १७ वर्षीय मुलगाच...

खून झाल्याचा संशय भावाने व्यक्त केला अन् भांडाफोडच झाला; १७ वर्षीय मुलगाच निघाला मारेकरी.. -स्मशानभूमीत गाळलेला मृतदेह पोलिसांनी काढला होता बाहेर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-तालुक्याच्या दासगाव बुज गावात एक धक्कादायक तितकीच सस्पेन्स घटना रविवार २९ जून रोजी उघडकीस होती.विशेष म्हणजे,दासगाव बुज येथील एका ४५ वर्षीय महिलेचा शुक्रवार २७ जून रोजी मृत्यू झाला होता.मृत्यूनंतर नातेवाईक तसेच गावकऱ्यांनी मिळून गावातील स्मशानभूमीत दफन विधी करून अंत्यसंस्कार केले होते.मात्र,मृताचा भाऊ विनोद इतरू नंदेश्वर रा.हिवरा यांनी बहिणीचा झालेला मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी रावणवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी तक्रार नोंदवून रविवारी स्मशानभूमीत गाळलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात पाठविण्यात आला.भारती सुरेंद्र शहारे वय ४५ वर्षे,रा.दासगाव बुज असे मृत महिलेचे नाव आहे.पतीच्या निधनानंतर मुलगा व आई घरी राहायची.परंतु काही दिवसांपासून मुलगाही नागपूरला राहायचा.अधून-मधून तो गावाला येत असे.भारती शहारे गावातच नड्डे(पिंगर)आणि अंडी विकून आपले पोट भरायची.मुलगा गावाला आला आणि आईचा मृत्यू झाला.पहिल्या दिवशी तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे नातेवाईक व गावकऱ्यांना वाटले.परंतु पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून तिचा खून झाल्याचा दाट संशय बळावला अन् जमिनीत गाळलेला मृतदेह उकरून काढला.विशेष म्हणजे,मृत महिलेच्या १७ वर्षीय मुलाने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता.त्यामुळे पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत दुसऱ्या दिवशी शनिवारी मुलाचा शोध घेतला. तसेच रविवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तालुका दंडाधिकारी समशेर पठाण यांच्या उपस्थितीत मृतदेह उकरून बाहेर काढला.यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. त्यानुसार मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिला.नंतर व्हिसेरा तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूस डोक्यातील रक्तस्राव कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता.असेच पैसे मागण्यावरून गुरुवारी २६ जूनच्या रात्री दोन्ही मायलेकांत वाद झाला.या वादात मुलाने भारतीचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले, यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला.खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईचा जीव घेतला.प्रकरणी तिच्या १७ वर्षीय विधी संघर्षीत मुलावर काल,सोमवारी ३० जून रोजी रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रावणवाडीचे ठाणेदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!