Monday, May 18, 2026
Homeनागपूरआज महसूल मंत्र्यांचा नागपूर दौरा; नागपुरातील अतीवृष्टीच्या नुकसानीचा घेणार आढावा….

आज महसूल मंत्र्यांचा नागपूर दौरा; नागपुरातील अतीवृष्टीच्या नुकसानीचा घेणार आढावा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज, शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून देण्यात येणाऱ्या मदतनिधीचा ते आढावा घेणार आहेत .

२३ सप्टेंबर रोजी नागपुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.२४ सप्टेंबरपासूनच प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले असून आतापर्यंत २२ हजार ८२४ पंचनामे करण्यात आले. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मदतीचे वाटपही सुरू झाले आहे.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुपारी ३.३० वाजता काटोल तालुक्यातील कोंढाळी, पाणवडी, येरला, पारडशिंगा येथील नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी करतील. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पीक पाहणी पीकविमा, गौण खनिज वहिवाट रस्ते, सातबारा संगणकीकरण व लम्पी आदी विषयांवर आढावा घेतील.८ ऑक्टोबर रोजी महसूलमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, साठवण,भिसी,वहानगाव या चिमूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकसानीचा आढावा घेतील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!