Saturday, May 30, 2026
Homeकुरखेडाजंगली हत्तींनी वैरागड परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकांची केली नासाळी….शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान

जंगली हत्तींनी वैरागड परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकांची केली नासाळी….शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- मागील काही दिवसांपासून जंगली हत्तींचे आरमोरी तालुक्यातील जंगल परिसरालगत संचार सुरु आहे.सद्यस्थितीत या हत्तींचा संचार वैरागड, पाठणवाडा परिसरात सुरु आहे.गुरुवारी पाठणवाडा शेतशिवारात धुडगूस घातल्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने वैरागड- चामोर्शी मार्गावरील शेतशिवारात हैदोस घालित धान पिक नेस्तनाबूत केले.मागील दोन दिवसात वैरागडसह पाठणवाडा या शेतशिवारातील जवळपास ६२ शेतक-यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील धान पीक भूईसपाट झाल्याने हातचा  घास हिरावल्या गेल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत.गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तींनी वैरागड पाठणवाडा येथे धान पिकांची प्रचंड नासाडी केली होती.यात जवळपास ४२ शेतक-यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. शेतपिकात हैदोस घातल्यानंतर हत्ती परत जंगलाकडे प्रयाण केले.दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा वैरागड- चामोर्शी मार्गावरील वैरागड येथील शेतशिवारात या हत्तींनी धुडगूस घालित धान पीक नेस्तनाबूत केल्याची माहिती आहे.धानपीक सध्या स्थितीत कापणीच्या मार्गावर आहेत तर काहींचे पीक बहरत आहे.अशास्थितीत मागील काही दिवसांपासून या परिसरात रानटी हत्तींचा मुक्त संचार कायम असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.सदर. घटनेची माहिती प्राप्त होताच हुल्ला पथकासह वन विभागाच्या पथकाने काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळ गाठित मौका पंचनामा केला. वनरक्षक भारत शेंडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत शेतकऱ्यांची चौकशी केली.तात्काळ नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!