Wednesday, October 14, 2026
Homeनागपूरआज दीक्षाभूमीवर ७० वा धम्मचक्रप्रवर्तन दिन; लाखो अनुयायांसाठी परिसर सज्ज..

आज दीक्षाभूमीवर ७० वा धम्मचक्रप्रवर्तन दिन; लाखो अनुयायांसाठी परिसर सज्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह पवित्र दीक्षाभूमीवर बौध्द धर्म स्विकारला होता.आज त्याला ७० वर्षे पूर्ण होत असून डॉ.बाबासाहेबांचे लाखो अनुयायी या तारखेचे महत्व लक्षात घेता आज मोठ्या उत्साहात धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करणार आहेत.यासाठी नागपूरची पवित्र दीक्षाभूमी सजली असून लाखो अनुयायांसाठी परिसर सज्ज आहे.अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता परिसराभोवती कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबरला हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धर्म स्विकारला होता.या ऐतिहासिक सोहळ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून पवित्र दीक्षाभूमीवर सतत धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा होतो.१४ ऑक्टोंबर या तारखेचे महत्व अनुयायांसाठी विशेष आहे. त्यामुळे नागपूर शहर व आसपासच्या जिल्ह्यातील बौध्द अनुयायी आवर्जून पवित्र दीक्षाभुमीवर जातात.अन्याय, अत्याचार व गुलामीचे जोखड तोडून जगण्याचा मोकळा श्वास देणाऱ्या या महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करून,दीक्षाभूमीतून नवविचारांच्या क्रांतीची नवी ऊर्जा अनुयायी घेऊन जातात.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या निवासासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा विशेष व्यवस्था केली आहे.पहिल्यांदाच प्रशासनाच्या पुढाकारातून २४ निवास कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये एकाच वेळी सुमारे २३ हजार १०० अनुयायांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.निवासासोबतच पिण्याचे शुद्ध पाणी,पंखे,कूलर, मोबाईल चार्जिंग,स्वच्छ अंथरूण-पांघरूण आणि तक्रार निवारण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.निवास कक्षांसाठी सामाजिक न्याय भवन,दीक्षाभूमी परिसर,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर,आयटीआय इमारत,जिल्हा हिवताप कार्यालय,कुर्वेज शाळा उंटखाना,बेझनबाग आणि ड्रॅगन पॅलेस,कामठी आदी ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.या सर्व निवारा कक्षात एकूण २४ कक्षांत २३ हजार १०० अनुयायांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. लहान बाळांसह येणाऱ्या महिलांसाठी बाळांना स्तनपान करता यावे आणि मातांना आवश्यक विश्रांती मिळावी, यासाठी ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोऱ्यात तालुकास्तरीय युवा अडोस-पडोस संसद संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत,गडचिरोली आणि पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धानोरा येथे तालुकास्तरीय युवा...

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!