- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे काही खरे नाही.इथे कधी कोण काय करणार,हे सांगताच येत नाही.विशेष म्हणजे,गेल्या काही वर्षांपासून आता राजकारणातही भुरट्या चोऱ्या होऊ लागल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे राज्याचे राजकारण एक वेगळे वळण घेऊ लागले आहे.त्यातच,आज,बुधवार १२ नोव्हेंबरला
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत अंतिम सुनावणी होणार आहे.न्यायालय आज या प्रकरणी आपला निकाल देऊ शकते किंवा दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तिवाद ऐकूण आपला निकाल राखून ठेवू शकते.आजच्या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने खरी शिवसेना कुणाची? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड बंड केले होते.त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम गुजरात व तेथून गुवाहाटीला प्रयान केले होते.शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला.त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले होते.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.त्यांच्या या याचिकेसह इतर काही याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात एकगठ्ठा सुनावणी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे,आजच्या सुनावणीत कोणत्या बाजूने निकाल लागणार वा कोणत्या गटाचा विजय होणार,हे आज होणाऱ्या निकालात स्पष्ट होऊन कळणार आहे, ‘याची कां त्याची..!’ अग्नीपरिक्षा.
- Advertisement -

