Monday, August 31, 2026
Homeनागपूरबॉम्ब स्फोटानंतर नागपुरात हाय अलर्ट घोषित..!

बॉम्ब स्फोटानंतर नागपुरात हाय अलर्ट घोषित..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे सोमवार १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक एक जवळ सायंकाळच्या सुमारास एका उभ्या असलेल्या कारमध्ये भीषण स्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. घडलेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत १० नागरिकांना आपले प्राण गमावले लागले आहे,तर २५ पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.तपास यंत्रणांनी राबविलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान सुशिक्षित डॉक्टरांची टीम स्फोटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वजण अवाक् झाले आहेत. यामुळे देशाच्या विविध शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण,धार्मिक स्थळे,विमानतळ तसेच इतर ठिकाणी हाय अलर्ट घोषित करून खबरदारी घेतली जात आहे.अश्यातच देशभरात जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपराजधानीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून गस्त,तपासणी आणि श्वान पथकांच्या हालचालींना गती देण्यात आली आहे.अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो.त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.तसेच,बॅगेज आणि ओळखपत्र तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.सुरक्षा दलांच्या क्विक रिॲक्शन टीम्स सतत गस्त घालत असून,संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.श्वान पथकांचे सतत चेकिंग सुरू आहे. विमानतळावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची काटेकोर तपासणी केली जात आहे.विमानतळ परिसरात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)आणि स्थानिक पोलिस दलाच्या संयुक्त पथकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.धावपट्टी आणि हँगर परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे,टर्मिनल एरियात प्रवाशांच्या हँडबॅग्स आणि लगेजची तपासणी,तर बाह्य परिसरात पार्किंग आणि आगमन व निर्गमन रस्त्यांवर वाहन तपासणी तीव्र करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!