- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना वितरीत करण्यात येणार,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र,शासनाने केवळ ऑगस्ट महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी मंगळवारी ३४४ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केला होता. राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच खात्यात जमा करण्यात येणार असल्याची शक्यता असतांनाच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा करीत आज,गुरुवार ११ सप्टेंबर पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आजपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
- Advertisement -

