Tuesday, April 22, 2025
Homeगडचिरोलीआजपासून ते २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह..
spot_img

आजपासून ते २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे.
जलसंपदा विभागाच्या वतीने आज,रविवार १६ मार्च पासून ते येत्या २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात आज पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युथ अधिकारी अमित पुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अभियंता गणेश परदेशी,कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरुण वसवाडे,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअरचे संस्थापक आणि जलसंवर्धन सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट तसेच जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या अधीक्षिका श्रीमती गुरपुडे उपस्थित होत्या.
यावेळी उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी जलजागृती सप्ताहाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.तर कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण,जलप्रदूषण टाळणे तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.यासोबतच जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये जलप्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१६ ते २२ मार्च या सप्ताहात जिल्हा,तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा,चर्चासत्रे,वेबिनार,चित्रकला व रांगोळी स्पर्धा,कार्यशाळा,जलदिंडी,प्रभातफेरी आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्थळी भेटी यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास पुंडे,वासवाडे,हेपट आणि श्रीमती गुरपुडे यांनी जलसंवर्धनाविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन भांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यात सर्व उपस्थितांनी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागाचे अधिकारी,कर्मचारी,नागरिक, प्रशिक्षणार्थी परिचारिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू…

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी गावानजिक रामनगरजवळ सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी...

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण...

दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांसह,युवक, वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची बर्बादी करू लागले आहेत.काहीजण दारू ढोसून आपल्याच घरच्यांना त्रास देऊ लागले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!