Sunday, July 19, 2026
Homeब्रम्हपुरीआंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. - शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

आंघोळ करण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडाला.. – शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रहपुरी शहराच्या जानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा आंघोळीसाठी नाल्यातील पाण्यात उडी मारताच बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार २ जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ब्रम्हपुरी ते चांदगाव मार्गावरील डोंगे घाट नाल्यात उघडकीस आली.नैतिक अशोक शेंडे वय १६ वर्षे,रा.जानी वार्ड,ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे मृतक मुलाचे नाव असून तो ब्रम्हपुरी शहराच्या ख्रिस्तानंद शाळेतील दहावीचा विद्यार्थी होता.
नैतिक,आणि त्याचे मित्र जय राऊत रा.नान्होरी, ता.ब्रम्हपुरी व सौम्य ढोक रा.सम्राट अशोक चौक,ब्रम्हपुरी हे तिघेही ब्रम्हपुरी येथील क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळल्यानंतर चांदगाव मार्गावरील डोंगे घाट नाल्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते.तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम नैतिकने पाण्यात उडी मारली.बघता-बघता नैतिक पाण्यात दिसेनासा झाल्याने सोबतचे मित्र घाबरले. दरम्यान,सौम्य ढोक याने नैतिकच्या घरी जाऊन नैतिकचे वडील अशोक शेंडे यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.लागलीच अशोक शेंडे यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.घटनेची माहिती होताच नागरिकांचा मोठा जमाव गोळा झाला.शोधकार्य राबविण्यात आला.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’ फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका निवृत्त कर्मचाऱ्याला मोबाईल व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट 'एपीके' फाइल उघडणे चांगलेच महागात पडले आहे.फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून त्यांच्या...

चीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे.परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असलेल्या एका ४ वर्षीय चीमुकलिशी...

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!