- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करीत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज,गुरुवारी २८ नोव्हेंबरला संशय व्यक्त केला आहे.या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत; असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले म्हणाले की,७.८७ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.७६ लाख मते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान पडलेली आहेत; याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही.महाराष्ट्रात ५ लाखांहून अधिक मत आली,मग ती आली कुठून?असा सवालही त्यांनी केला.केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला.निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही; असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सात वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशीरा देण्यात आला.निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु,६२.२ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री ११.३० वाजता सांगितले.यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते.तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की,६६.५ टक्के मतदान झाले.मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे.परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही.
सुमारे ७६ लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे.याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे २०२० ला भाजपचे ठरले होते.पक्ष फोडले,चिन्ह घेतले,न्यायव्यवस्था हाती घेतली.सर्व बेकायदेशीर असुन सुप्रीम कोर्ट लक्ष द्यायला तयार नाही.असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? राजकारण सोडलेले बरं,अशी खंत पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.
- Advertisement -