Thursday, October 8, 2026
Homeचंद्रपूरअवैध रेतीची वाहतूक; ट्रकसह दोघांना अटक..

अवैध रेतीची वाहतूक; ट्रकसह दोघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाने आज,गुरुवार २० ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर मोठी केली.कारवाईत तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा १६ चाकी ट्रक आणि सुमारे ६० हजार रुपये किंमतीची बारा ब्रास रेती असा एकूण ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२),भारतीय न्याय संहिता(बीएनएस)तसेच जमीन महसूल कायद्यान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनमालकाचा शोध सुरू आहे.शरद पुंजराम शेंद्रे वय ३९ वर्षे,रा.तादेगाव ठाकूर,ता.तिवसा,जि.अमरावती याच्यासह सिद्धार्थ विनायकराव गडलिंग वय ३३ वर्षे, रा.परतोडा,ता.आर्वी,जि.वर्धा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.तर वाहनमालक समरजीत दर्शनसिंग गरेवाल रा. गुरुकुंज मोजरी,ता.तिवसा,जि.अमरावती याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आज स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाला रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत एमएच ४० सीटी ४१३३ क्रमांकाचा १६ चाकी पल्ला ट्रक आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये बारा ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन आणि रेती ताब्यात घेतली असून जप्त करण्यात आलेल्या १६ चाकी वाहनाची अंदाजे किंमत ४० लाख रुपये,तर रेतीची किंमत सुमारे ६० हजार रुपये असा एकूण ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!