Monday, May 4, 2026
Homeकुरखेडाअवैध दारु विक्रेत्यांना तंबी; चारभट्टी ग्रामसभेचा निर्णय..

अवैध दारु विक्रेत्यांना तंबी; चारभट्टी ग्रामसभेचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(गडचिरोली) :- नवीन वर्ष,नवे संकल्प करीत कुरखेडा तालुक्याच्या चारभट्टी ग्रामपंचायतीतील आयोजित ग्रामसभेत अवैध दारूबंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.दारू विक्रीमुळे गावाच्या विकासात बाधा येत असून युवां पिढी व्यसनाधीन होते.अनेकजण नशेच्या आहारी जाऊन कित्तेक जणांची संसारे उघड्यावर पडलेली आहेत.त्यामुळे अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करून दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. निर्णयाचे उल्लंघन करून दारू विक्री करताना आढळून आल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई व शासकीय कागद पत्रांपासून वंचित ठेवण्यात येणार; अशी तंबी देण्यात आली.दारु विक्रेत्यांना तंबी देत अवैध दारु विक्री केल्यास २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचाही निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक  आंबोने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!