उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):- कुरखेडा शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आझाद वार्ड निवासी शुभम सुरेश जौसीया वय २७ वर्षे या युवकाला काल, शनिवारी २० जुलैच्या दुपारी २ वाजता अटक करण्यात आली.
२७ वर्षीय युवक शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत मागील काही महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता.सदर बाब तिच्या कुटुंबीयांना कळताच पोलिसांत धाव घेत युवका विरोधात पोलीस स्टेशन कुरखेडा येथे तक्रार दाखल केली.तक्रारीवरून आरोपी शुभम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ६४(१),६४(२) एमआय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला.मात्र,आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला होता. यावेळी पोलीसांनी तत्परता दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या आधारे त्याला अटक केली.घटनेचा पुढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे व पोलीस हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.