Wednesday, October 28, 2026
Homeभंडारा'अरे मी तुझे ३ ट्रॅक्टर सोडून दिले'...! रेती चोराशी मोबाइलवर संभाषण करणे...

‘अरे मी तुझे ३ ट्रॅक्टर सोडून दिले’…! रेती चोराशी मोबाइलवर संभाषण करणे पोलिस हवालदारास पडले महागात.. – पोलिसाची तडकाफडकी बदली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अवैध धंदे करणारे व रेती तस्करांशी हातमिळवणी करून सुमधुर संबंध असणाऱ्या चर्चित पोलीस जमादारास यावेळी चांगलेच महागात पडले असल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात उघडकीस आली आहे.मोहाडी तालुक्यातील करडी ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल (हवालदार) अर्पित भोयर यांची जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या आदेशावरून तडकाफडकी पोलिस मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात भोयर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.दरम्यान,रेतीच्या ३ गाड्या सोडून देण्याचे प्रकरण त्यांना यावेळी चांगलेच महागात पडले.दोन वर्षाआधी अर्पित भोयर करडीत हेड कॉन्स्टेबल(हवालदार) म्हणून रूजू झाले.अवैध व्यावसायिक व रेती तस्करांशी साटेलोटे व मधूर संबंधामुळे ते चर्चेत होते.ऑगस्ट महिन्यात निलज (खुर्द) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीचे पिल्लू वाहनाच्या धडकेत ठार झाले होते.हवालदार भोयर यांना याबाबत सूचना देण्यात आली.त्यांनी तक्रार लिहून न घेता परस्पर वाहन चालकाशी बोलणी करून गुन्ह्याची नोंद केली नव्हती.भगवान चांदवार यांनी पाठपुरावा केल्याने ८ दिवसांनी गुन्ह्याची नोंद झाली.देव्हाडा येथील एका रेती चोराशी मोबाइलवर संभाषण करताना ‘मी तुझे ३ ट्रॅक्टर सोडून दिले’, असे म्हणने यावेळी भोयर यांना चांगलेच महागात पडले.सदर प्रकरण पोलिस अधीक्षकांच्या कानावर जाताच त्यांनी तातडीने दखल घेत मुख्यालयी रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!