उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील अह्रेर- नवरगाव,बोडदा चिचगाव आणि हळदा या नावाने वैनगंगा नदी येथील चार घाट खणीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास तसेच शासकीय योजनेअंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांना वाळू पुरवण्याकरिता दिलेले होते.शासकीय प्रकल्पाचे नाव पुढे करून अवैधरित्या थेट नदीमधून रेती उत्खनन करून खाजगी बांधकामाच्या ठिकाणी धाडून करोडो रुपयांची वाळू परस्पर विकण्यात आली आहे.
नियमानुसार वाळू उत्खनन स्थानिक मजुरांच्या माध्यमातून करायचे असते आणि नदीतून स्टॉक यार्ड पर्यंत ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करायची असते; परंतु या ठिकाणी सर्व नियम व कायद्याला बाजूला ठेवत थेट नदीमधून ट्रक द्वारे,पोकलेन द्वारे हजारो ट्रक वाळू बाहेर विकण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये सुमारे ४०० कोटींचा रेती घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काल बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा ग्रामविकास पंचायतराजचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे यांनी केला आहे.नागपूर येथील शिंदे गटातील स्थानिक राजकारण्यांनी पदाच्या दुरुपयोग करीत गौण खनिज संदर्भात (रेती घोटाळा) ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा शासकीय महसुल घशात घातला आहे.त्यामुळे त्यांनी राज्य सरकारची फसवणूक केले.त्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.