उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ३७ (क) नुसार जेथे अशी जमीन,गृहनिर्माण योजना,आसरा, व्यवसाय स्थापना,धंदा, उपक्रम,करमणूक केंद्र आणि उत्पादन केंद्र,अश्या उद्देशासाठी वापरले जाणार आहे;अश्या स्थळी सवलतीच्या दराने वाटपात ५% आरक्षण देणे अशी कायद्यात तरतूद आहे.त्यानुसार त्यावर अंमलबावणी करण्यात येत नसल्याने अपंग बांधवांचे अधिकार हिरावून घेतल्या जात आहेत.अपंग बांधवांचे अधिकार व कायद्यातील तरतुदीनुसार गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील ५% आरक्षणा प्रमाणे गाळे राखीव ठेऊन व अपंग व्यक्तीनंकडून अर्ज मागवून सवलतीच्या दरात गाळे देण्यात यावे; अशी मागणी मुकुंदराव उंदीरवाडे यांनी गडचिरोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे केली आहे.
मुकुंदराव उंदीरवाडे हे गडचिरोली येथील रहिवासी असून स्वतः ५०% अपंग व्यक्ती आहेत.ते नेहमी अपंग बांधवांच्या हितासाठी कार्य करीत असतात.मात्र जिल्ह्यातील अपंग बांधवांना अजूनही आपले अधिकार काय आहेत हे त्यांना कळलेलेच नाहीत. अपंगांसाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जातात.त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.काही शासकीय कार्यालये अपंग बांधवांच्या कायद्याच्या तरतुदींना ठेंगा दाखवीत असतात.कित्तेक वर्षे लोटूनही वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत नाही.अशांवर आळा घालणे आवश्यक आहे.उंदीरवाडे यांनी यापूर्वी सुद्धा ५% आरक्षणाबाबत विनंती अर्ज केलेला होता.मात्र अजूनपर्यंत त्यावर कार्यवाही केली किंवा नाही.यासाठी त्यांनी केलेल्या कार्यवाही अहवालाच्या प्रतीचीही पत्रकाद्वारे मागणी केली आहे.