उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- अनेक गरजू कुटुंबातील ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित असल्याने इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांप्रमाणेच ओबीसी समाजातील बांधवांकरिता विशेष वेगळी घरकुल योजना सुरू करण्यात यावी.अशी मागणी ओबीसी समाजाकडून जोर धरू लागली आहे.
शासनातर्फे अनुसूचित जाती,जमाती,एनटीव्हीजे साठी वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना सुरू आहेत.अशातच विविध समाजातील एकंदरीत वेगवेगळ्या जाती-धर्मातील नागरिकांकरिता केवळ पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित असल्याने पाहिजे त्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गातील गोरगरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांना घरकुलाचे लाभ मिळत नाही.राज्यात व जिल्ह्यात सर्वाधिक संख्या ओबीसी समाजाची आहे.गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामध्ये ६० टक्के ओबीसी बांधव वास्तव्यास आहेत.ओबीसी समाजातील अनेक कुटुंबातील सदस्य केवळ पंतप्रधान आवास योजना सुरू असल्याने घरकुलाचे लाभापासून वंचीत असल्याचे कळते.काही घरकुल योजनांमध्ये पुन्हा-पुन्हा घरकुलाचे लाभ दिल्या जात असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.मात्र ज्यांनाअतिआवश्यक आहे.अशा लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ दिले जात नाही.ग्रामीण भागातील अनेक ओबीसी बांधव अजूनही घरकुलाचे लाभ मिळण्याच्या आशेवरच जीवन जगत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
यासाठी शासन स्तरावरून ओबीसी समाजातील गोर-गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवा याकरिता पंतप्रधान आवास योजने व्यतिरिक्त विशेष वेगळी इतर योजना सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.