Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीअतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १० कोटीची रक्कम थेट बँक खात्यात...

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १० कोटीची रक्कम थेट बँक खात्यात जमा.. – हेक्टरी १० हजार प्रमाणे अतिरिक्त अनुदानास मंजुरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा देत जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी प्राप्त सुमारे २९ कोटी रकमेपैकी १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला आहे.
जून ते सप्टेंबर २०२५ या पहिल्या टप्प्यात एकूण २१ हजार ४९५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.यासाठी पहिल्या टप्प्यातील  १५ कोटी ६३ लाख १२ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून त्यापैकी १५ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये इतका निधी थेट जमा करण्यात आला आहे.याचबरोबर शासनाने प्रति हेक्टरी १० रुपये हजार याप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यास दिनांक-४ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजुरी दिली आहे.यासाठी सध्या १३ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.तर ऑक्टोंबर २०२५ मधील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ६२१ शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार ७ हजार ४५ हेक्टरवरील शेत पिकाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात येत आहे.
जमा न झालेल्या रकमेसाठी तात्काळ संपर्क साधावा -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा👇
 “ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा झाली नसेल,त्यांनी विलंब न लावता तातडीने संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असल्यास किंवा बँक खाते नोंदीत नसून निधी परत गेला असल्यास,त्वरित आवश्यक कार्यवाही करून घ्यावी. निधी मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये,यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील,” असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!