Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाभर १५ दिवस जमावबंदी आदेश..

गडचिरोली जिल्हाभर १५ दिवस जमावबंदी आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७(१) आणि (३)अन्वये जिल्हाभर १५ दिवसांसाठी जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचा आदेश शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत लागू राहील.विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सभा,मोर्चे,आंदोलने, मिरवणुका किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.या कालावधीत कोणालाही शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,दंडे,बंदुका, सुरे,काठ्या,लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यास उपयोगी पडतील अशा वस्तू बरोबर बाळगण्यास सक्त मनाई आहे.तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे बरोबर ठेवणे,तयार करणे किंवा जमा करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.तसेच या आदेशान्वये कोणालाही उत्तेजक घोषणाबाजी,आवेशपूर्ण भाषणे,अनुचित हावभाव,अश्लील गाणी किंवा सभ्यता आणि नीतिमत्तेला धक्का पोहोचवणारे वर्तन करण्यास मनाई आहे.राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल,अशा प्रकारचे फलक,चित्रफीत,चिन्हे, प्रतिमा किंवा प्रतीकांचे प्रदर्शन किंवा प्रसारण करणेही प्रतिबंधित आहे.उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही मिरवणूक काढू शकणार नाही.तसेच पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा समूह सार्वजनिक जागेत,रस्त्यावर किंवा चावडीवर एकत्र येऊ शकणार नाही,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!