- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली.विशेष म्हणजे,कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही मदत मंजूर झाली.
मागील काही दिवसांपूर्वी कुरखेडा व परिसरात धो-धो पाऊस बरसल्याने शहरातील नरेश हडप यांचे घर पडले होते.घर पडल्याने आता राहायचे कुठे?असा प्रश्न हडप कुटुंबीयांना पडला होता.अश्यातच घर पडल्याची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ वैद्य, महादेव पुंगळे व भरत भट्टड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.त्यानंतर कुरखेडा तहसीलचे तहसीलदार शशिकांत जाधव व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पंचनामा व आर्थिक मदतीच्या कार्यवाहीची मागणी केली. प्रशासनाने तातडीने दखल घेत हडप कुटुंबाला आर्थिक मदत मंजूर केली व त्याचे वितरण करण्यात आले. दरम्यान,तालुक्यातील इतर अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांनाही लवकर मदत देण्यासह पूर्णपणे घर पडलेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याची मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे.
- Advertisement -

