- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना काल,शनिवार १४ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी गावाजवळ घडली.हिवराज पुरुषोत्तम मारगाये वय ३१ वर्षे रा.गोठणगांव, ता.कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मृतक हिवराज हा काही कामानिमित्त अंतरगाव येथे मामाच्या घरी गेला होता. काल शनिवारी सांयकाळी तो स्वतःच्या दुचाकी क्रमांक-एम एच ३३ ए ई-७९९० ने गोठणगांव येथे परत येत असतांना लेंढारी गावाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली.यावेळी तो बराच काळ रस्त्यावरच बेशुध्द होऊन पडलेला होता.अशातच मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सदर अपघात निदर्शनास येताच,कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेला सूचना दिली.त्यानंतर हिवराजला रुग्णवाहिकेने कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
- Advertisement -