Wednesday, May 13, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची धडक; अस्वलाचा मृत्यू..

अज्ञात वाहनाची धडक; अस्वलाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढाळी-अमरावती महामार्गावरील जुनापाणी गावानजीक पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.मृत अस्वल हे मादी असून,अंदाजे १२ वर्षे वयाचे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. कोंढाळीपासून १२ किलोमिटर अंतरावरील जुनापाणी गावानजीक रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाला.याबाबत माहिती मिळताच कोंढाळी वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक राजेश सूर्यवंशी,खापरी बिटचे वनरक्षक चन्ने,वनरक्षक नगीना मेश्राम,वनमजूर किशोर कुसळकर,पुंडलिक सरोदे आदी तातडीने घटनास्थळी पोहोचले.मृत अस्वलाचा पंचनामा करून,मृतदेह शविच्छेदनासाठी नागपूर येथील वनविभागाच्या सेमिनरी हिल्स रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात आला.नागपूर-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात कोंढाळी भागातील संरक्षित वनात वृक्ष कटाई करून नुकसान करण्यात आले. शिवाय,मार्गाचे चौपदरीकरण करतांना वन्यप्राण्यांसाठी कोणतेही अंडरपास बांधण्यात आले नाही,त्यामुळे महामार्गावर वाघ,बिबट,अस्वल,नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा वाहनाच्या धडकेने सतत मृत्यू होत आहे.यावर वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह...

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!