Tuesday, May 26, 2026
Homeकोरचीअजब प्रेमाचा गजब शेवट…..-कोरची तालुक्याच्या दवंडी गावातील हत्यारांचा झाला उलगडा….-गुन्हातील आरोपी पोलीसांच्या...

अजब प्रेमाचा गजब शेवट…..-कोरची तालुक्याच्या दवंडी गावातील हत्यारांचा झाला उलगडा….-गुन्हातील आरोपी पोलीसांच्या ताब्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची (गडचिरोली) :- कोरची तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बेडगाव पासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या किराणा दुकानदार लखन सुन्हेर सोनार वय ३८ वर्षे रा.दवंडी गावातील नामक व्यक्तीची ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी तोंडाला काळे रुमाल बांधून रात्रौ १०.४५ वाजताच्या सुमारास राहत्या घरात आतमध्ये प्रवेश करून पत्नी समोरच धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती.त्यानुसार सदर हत्तेचा अवघ्या तीन दिवसांतच कोरची पोलीसांनी छडा लावला आहे.

प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र.९९/२०२३ कलम ३०२,३४ भांदवी अन्वये दिनांक- १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी ९.२५ वाजता अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरिक्षक फडतरे व पोलीस मदत केंद्र बेडगावचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सुर्यवंशी यांनी गोपनीय यंत्रणा तयार करुन सतर्क करत गावातील रहिवासी,नातेवाईक यांचेकडे सखोल चौकशी केली असता; मयताची पत्नी नामे- सरिता लखन सोनार रा.दवंडी हीचे दवंडी येथील सुभाष हरिराम नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पती नामे-लखन यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली.याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत मयताच्या पत्नीकडे अधिक विचारपुस करण्यात आली. सुरुवातीला तिच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.त्यानंतर तिला घेऊन विचारपुस केली असता, तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मय्यत लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करत होता व तिचा शारीरिक मानसिक छळ करीता होता.या त्रासाला कंटाळुन आरोपी मयताची पत्नी सरिता हिने तिचा प्रियकर नामे-सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा या करीता तगादा लावला.त्यावर दिनांक- ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी बळीराम गावडे रा. कुकडेल यांचेकडे देण्यात आली.नियोजीत दिनांक- ११ ऑक्टोंबर २०२३ चे रात्री अंदाजे १०.४५ वाजताच्या सुमारास मारेकरी बळीराम गावडे याने मय्यताची पत्नी सरिता हिच्या मदतीने घरात प्रवेश केला व धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या करुन निघुन गेला.सदर घटनेतील सर्व कबुली मयताची पत्नी सरिता हिने दिलेली असुन गुन्हातील सर्व आरोपी नामे-सरिता लखन सोनार,सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी व बळीराम गावडे रा.कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र,बेडगाव चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा आज,मंगळवार २६ मे...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी.. – वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे...

​अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.. -दोन वेगवेगळ्या छाप्यात ५ आरोपींवर गुन्हे दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेश मेश्राम व पोलीस कॉन्स्टेबल नितीन...

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!