Tuesday, July 28, 2026
Homeनागपूरअजबचा कारनामा..! ठकबाजाने दहा वर्षांपूर्वी पाच कोटीला विकलेला भूखंड परत दुसऱ्याला विकला..

अजबचा कारनामा..! ठकबाजाने दहा वर्षांपूर्वी पाच कोटीला विकलेला भूखंड परत दुसऱ्याला विकला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एकच जमीन दोन जणांना विकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा ठकबाज गुणवंत तुमसरेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.दहा वर्षांपूर्वी विकलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांचा भूखंड त्याने दुसऱ्याला विकला.बेलतरोडी पोलिसांनी तुमसरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.फसवणूक,जमीन बळकावणे,पोलिसांवर हल्ला करणे,असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,फसवणूक आणि गुन्हेगारीच्या जगात त्याचा प्रभाव असण्यासोबतच त्याचा पेट्रोल पंप आणि बारही आहे.निहाल तिवारी याचे वडील गोविंद तिवारी यांनी २००५ मध्ये तुमसरे याच्याशी बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत गोटाळ पांजरी येथे ८ हजार चौरस फुटांच्या दोन भूखंडांचा सौदा अंबा गृहनिर्माण संस्थेमार्फत केला होता.९ मे २०१६ रोजी गोविंद तिवारी यांचा गच्चीवरून पडून मृत्यू झाला.वडिलांच्या निधनानंतर निहाल,त्याची आई व कुटुंबीय तुमसरेकडे गेले व त्याला प्लॉट दाखवण्यास सांगितले.तुमसरेने प्लॉट दाखविण्यास नकार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली.यामुळे तिवारी कुटुंबीय दहशतीत आले.
जानेवारी २०२३ मध्ये निहाल कुटुंबीयांसह प्लॉटवर गेला होता.तिथे त्याला इतर लोकांचे फलक दिसले. याबाबत संपर्क साधला असता,कथित भूखंडधारक त्याच्या साथीदारांसह तेथे आला आणि निहालला धमकावू लागला.निहालने बेलतरोडी पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली.परंतु त्याच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.जुलै २०२४ रोजी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी भूमाफियांपासून त्रस्त लोकांसाठी पोलिस आयुक्तालयात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन केले होते.याप्रकरणी निहालने फिर्याद दिली.पोलिस आयुक्तांच्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला.त्याआधारे तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसरेला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.असे असतांनाही तो भूमाफिया बनून लोकांचे प्लॉट बळकावत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!