Friday, August 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; 'या' तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून योजनेच्या हप्त्याची रक्कम वितरित होणार असून एका क्लिकवर देशभरातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात करण्यात येणार असून राज्यातील व विविध जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे,केंद्र सरकारने हा दिवस देशभरात पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल ९० लाख ८५ हजार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.तत्पूर्वी शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र,खानापारा, गुवाहाटी(आसाम)येथून २२ वा हप्ता वितरीत करण्यात आला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? मका दळून मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली(रेशन)अंतर्गत गव्हासोबत किंवा काही प्रमाणात गव्हाऐवजी मक्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र,या...

‘त्या’ वाघासाठी आठ ट्रॅप कॅमेरे व दोन अत्याधुनिक लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे डिजिटल नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात तीन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून ५५ वर्षीय शेतकरी...

तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; नागरिकांचा संताप.. -नराधम आरोपीचे वकीलपत्र न घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर एका ३० वर्षीय नराधमाने सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात संतापाचा भडका उडाला...

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी महिला लोकशाही दिन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या,सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!