उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील एजंट मंगेश नरड याने नवेगाव येथील १० नागरिकांकडून राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून दैनंदिन ठेवीसह फिक्स डिपॉझिट म्हणून जवळपास ६७ लाखांची रक्कम गोळा केली.रक्कम तर गोळा केली; मात्र काही गुंतवणकादारांना पैशाची गरज पडली असता पतसंस्थेत काही नागरिक गेले व रकमेविषयी चौकशी केली.एजंटाने गोळा केलेल्या रकमेची पतसंस्थेत नोंदच नसल्याचे उघड झाल्याने सदर प्रकरण चव्हाट्यावर आला होता.
नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच संबंधितांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवीत अखेर एजंट मंगेश नरड यांस चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून २४ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.नरड याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगेश नरड हा विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा दैनिक ठेवी गोळा करण्याबरोबरच तो पतसंस्थेचा व्यवस्थापक म्हणून काम सांभाळत होता.गेल्या अनेक वर्षापासून तो पतसंस्थेत काम करीत असल्याने खातेधारकांचा त्याने विश्वास संपादन केला होता.मात्र पैश्याच्या हव्यासापाई सर्वकाही गमावून बसला.