Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर.. - देसाईगंज तालुक्यातील जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू...

अखेर पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर.. – देसाईगंज तालुक्यातील जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचा मुद्दा गाजणार काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पावसाळी अधिवेशनाची तारीख आज,गुरुवार २६ जून रोजी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली असून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे येत्या,सोमवार ३० जून पासून ते १८ जुलै पर्यंत मुंबईत चालणार आहे.तब्बल १९ दिवसांच्या कालावधीतील शनिवार आणि रविवार असे चार दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या वगळून प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असणार आहेत.यंदाचे पावसाळी अधिवेशन हे चांगलेच गाजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार २९ जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.विशेष म्हणजे, अधिवेशन दरम्यान विरोधकांकडून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती सुरुवातीला करण्यात आली होती.मात्र,प्रचंड टीका झाल्यानंतर राज्य सरकारने शुद्धीपत्रक काढून हिंदी भाषेच्या अनिवार्यतेची अट मागे घेतली होती. त्यामुळे सदर मुद्दा,तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने कोल्हापूर,धाराशिव,बीड आणि अन्य भागात शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात असल्याने हाही मुद्दा चांगलाच गाजू शकतो.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बोनसची रक्कम, कर्जमाफी व नुकतेच देसाईगंज तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राकरीता जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड सारख्या भूसंपादन करण्यात येणाऱ्या शेतजमिनी विषयी विरोधकांकडून वाचा फोडली जाणार की नाही? हे येत्या कालावधीत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!