- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल गांधीगेट परिसरात औरंगजेबाच्या कबरीचे दहन केले होते.या घटनेनंतर,मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान यांनी काही युवकांनी ‘आयत’ असलेली चादर जाळल्याचे सांगून हे धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले.यानंतर,फहीम खान यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चादर जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी त्यांना आश्वासन देऊन परत पाठवले.मात्र,त्यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली काही युवक जात असतांना त्यांनी घोषणाबाजी केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि दंगल उसळली.
नागपूर दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागपूर सायबर पोलिसांनी याप्रकरणी ५० हून अधिक आरोपींवर कठोर कारवाई करत गंभीर कलमे लावली आहेत.काही व्हिडिओ आणि मॅसेज परदेशी आयपी अॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आल्याचे उघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत अनेक संशयितांवर लक्ष केंद्रित केले आणि यामागे मास्टरमाइंड म्हणून फहीम खानचे नाव समोर आले.नागपूर सायबर पोलिसांनी या संपूर्ण कटाचा तपास सुरू केला असून, आरोपींनी वापरलेले मोबाईल आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
- Advertisement -